वार्ताहर/ हंचिनाळ
बोरगावच्या अरिहंत उद्योग समुहाकडून येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी 51 हजार रुपयांची देणगी उत्तम पाटील यांच्या हस्ते सुरेश बस्तवाडे व यात्रा समिती सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी निपाणीसह परिसरातील विविध मंदिरांना लाखो रुपयांची देणगी दिल्याबद्दल उत्तम पाटील यांचा जीर्णोद्धार कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हंचिनाळ पीकेपीएस चेअरमन अरुण चौगुले, संचालक अजित पाटील, काकासो पंचम, कोगनोळीचे उमेश पाटील आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम हनुमान मंदिराच्या प्रांगणात पार पडला.
यावेळी उत्तम पाटील म्हणाले, आमच्याकडे कोणतेही राजकीय पद नसताना अरिहंत उद्योग समुहामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. विविध गरजू लोकांना सहकार्य केले आहे. भविष्यातही सामान्य नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी उमेश पाटील, तायगोंडा पाटील, अजित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास कुमार गुरव, सिदगोंडा वंदुरे, दीपक पाटील, सदाशिव कांबळे, राजाराम नलवडे, दयानंद पाटील, अशोक कोंडेकर, विजय नलवडे यांच्यासह पीकेपीएस आणि जीर्णोद्धार समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. पीकेपीएसचे सचिव हेमंत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.









