पॅरीस
झेक प्रजासत्ताकमध्ये शनिवारी झालेल्या एटीपी टूरवरील प्राग्वे पुरूषांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद स्वीत्झर्लंडचा टेनिसपटू वावरिंकाने पटकाविले. अंतिम सामन्यात त्याने रशियाच्या कॅरेटसेव्हचा पराभव केला.
2016 साली अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविणाऱया वावरिंकाने अंतिम सामन्यात कॅरेटसेव्हचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव केला. दुखापतीमुळे तसेच कोरोना महामारी समस्येमुळे वावरिंकाला किमान सहा माहिने टेनिसपासून अलिप्त रहावे लागले होते. वावरिंका 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता कमी असून आता तो 27 सप्टेंबरपासून पॅरीसमध्ये खेळविल्या जाणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेवर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.









