वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी (अमेरिका)
सिनसिनॅटी मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या सातव्या मानांकित कोको गॉफने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात गॉफने स्वायटेकचे आव्हान 7-6(7-2), 3-6, 6-4 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारी 19 वर्षीय कोको गॉफ ही सर्वात तरुण टेनिसपटू ठरली आहे. सबालेंका आणि मुचोव्हा यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर गॉफची अंतिम फेरीची लढत होईल.









