प्रतिनिधी / जयसिंगपूर
सांगली – कोल्हापूर महामार्गावरील आचार्य श्री तुलशी बँकेसमोर रस्त्यावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम खात्याचा जाहीर निषेध केला यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले होते. अखेर खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आला मात्र यापुढे प्रशासनाकडून होणारा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर मादनाईक यांनी दिला आहे.
या मार्गावर मोठा खड्डा पडल्याने वाहतूक धारकांना गाडी चालवणे मुश्किल बनले होते. ही गोष्ट सागर माधनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आणून देण्यासाठी तातडीने कार्यकर्त्यांच्या समवेत रस्ता रोको आंदोलन करीत पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केले. यानंतर उपअभियंता जहांगीर बागवान शाखा अभियंता प्रीतम रजपूत यांनी घटनास्थळी पोचून कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
कार्यकर्त्यांनी या दोन्ही अभियंत्यांना धारेवर धरले अखेर खड्ड्यामध्ये मुरूम टाकून खड्डा मुजवून घेण्यात आला या आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतूक कोळंबी खोळंबून पडली मात्र या आंदोलनामुळे बांधकाम विभागाने तातडीने मुरूम टाकून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला यामुळे वाहतूक धारक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.