प्रतिनिधी / कोल्हापूर
दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
शुक्रवारी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्यांशी संवाद साधला. घटलेल्या दुधाच्या दराबद्दल आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल, विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत. याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे. 52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रूपयांवरून 180 रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे. देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर 340 रूपयावरून 220 रूपये झाले आहे.याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था 17 ते 20 रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत.
दूध उत्पादक शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात पँकीग दुधात 19 लाख लिटरने घट झालेली आहे. सन 2018 मध्ये आम्ही दूध आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रति लिटर 5 रूपयेचे अनुदान जाहीर करून 700 कोटी रूपयेचे अनुदान दूध उत्पादकांना दिले होते. याचा फायदा राज्यातील 46 लाख दूध उत्पादकांना झाला होता. त्याप्रमाणे राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास 5 रूपयांचे अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडर बफर स्टॉक करावा. दूध पावडर करीता प्रतिकिलो 50 रूपये अनुदान देण्यात यावे. दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावे.
या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 21 जुलै रोजी एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी सोशल डिस्टन्स सर्वांनी पाळायचे आहे. त्यादिवशी श्रावण महिन्याचा पहिला दिवस असून शेतकर्यांनी गावातील ग्रामदैवताला प्रतिकात्मक अभिषेक घालून आपलं दूध घरातच ठेवावे. तसेच गोरगरीबांना दुधाचे वाटप करावे. कुठेही दुधाची नासाडी करू नका. सर्व दूध संघानीही आमच्या दूध बंद आंदोलनला पाठिंबा द्यावा. हे एक दिवसाचे दूध बंद आंदोलन करून सरकारला हा निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे. यावर केंद्र व राज्य सरकारने आमचे ऐकलं तर ठीक अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशाराही यावेळी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








