बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा १५ ऑगस्ट रोजी बेंगळूरच्या मानेकशॉ परेड मैदानात राष्ट्रध्वज फडकवणार आहेत.
बेंगळूर शहर पोलिस आयुक्त कमल पंत यांनी साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी अग्रभागी काम करणारे सुमारे 75 कोविड योद्धा आणि संसर्गातून बरे झालेले 25 लोक या कार्यक्रमास विशेष आमंत्रित असतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमस्थळी निवडलेले प्रतिनिधी, पक्षनेते, सरकारी अधिकारी आणि इतर मान्यवरांसह 500 लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आहे.









