बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य पोलिस दलातील तब्बल चार अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यामध्ये उत्तेजन देण्यासाठी आणि चांगली कामगिरी केल्याबद्दल सन २०२०’ च्या केंद्रीय गृहमंत्री पदकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
राज्यातून निवडलेले अधिकारी
सुधीर एम. हेगडे (एसीपी, मायको लेआउट, बेंगळूर )
अशोका ए. डी. (डीवायएसपी, रेल्वे उपविभाग, बेंगळूर )
एच. एस. श्रीधरप्पा (सीएचसी, अशोकनगर, बेंगळूर )
डी. एम. प्रशांत बाबू (पीआय, सीसीबी, बेंगळूर शहर)