ओटवणे/ प्रतिनिधी-
वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावचा सुपुत्र स्वप्निल अरुण होडावडेकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवले आहे. त्यानुसार जाहिर झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ यामध्ये महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागमध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी -२ (Gazetted officer) या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्याच प्रयत्नात स्व अध्ययनातून स्वप्निलने हे यश मिळवले आहे.
स्वप्निलचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माणगाव येथे झाले असुन विज्ञान शाखेतून अकरावी बारावीचे शिक्षण कोल्हापूर विवेकानंद कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर ओरोस येथे त्याचेअभियांत्रिकी शिक्षण ( civil engineering) झाले. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत, सातत्य, संयम आणि आत्मविश्वास ही चतुर्सुत्री महत्वाची असून या गुणांमुळे त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरविले.
स्वप्नील सध्या पुण्यात कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करत आहे. सध्या तो वर्ग १ अधिकारी पदासाठी अध्ययन करीत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा बाबत जाणीव निर्माण करण्यासह एक अभ्यास चळवळ उभी राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा त्याचा मानस आहे. स्वप्निलचे वडील अरुण होडावडेकर ओटवणे शाळा नं १ चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक आहेत. बहीण अँड स्नेहल होडावडेकर एलएलबी पदवीधारक असुन आई सौ. अर्चना गृहिणी आहे. स्वप्निलने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.









