24 इंचापेक्षा अधिक उंची होणार नाही
अमेरिकेच्या लुसियानामध्ये एका मुलीच्या कमी उंचीमुळे तिच्या आईवडिलांची चिंता वाढली आहे. दोन वर्षीय या मुलीची उंची 24 इंचापर्यंतच वाढणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने ही चिंता निर्माण झाली आहे. या मुलीला ड्वॉर्फिजम नावाचा आजार आहे. या आजारामुळे माणसाची उंची वाढत नाही.
लुसियानात जन्म घेतलेल्या या मुलीचे नाव अबीगेल आहे. दोन वर्षीय अबीगेलचे वजन केवळ 3.18 किलोग्रॅम आहे. तिची उंची सध्या इतकी कमी आहे की ते खेळण्यांचे कपडेही परिधान करू शकते. तिच्या बाजूला ठेवण्यात आलेली खेळणी तिच्याहून अधिक मोठी वाटतात. अबीगेलला मइक्रोसेफेलिक नावाचा दुर्लभ आजार असून यामुळे तिची उंची 24 इंचापर्यंतच पोहोचेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
गरोदरपणावेळीच डॉक्टरांनी गर्भातील मुल योग्यप्रकारे विकसित होत नसल्याचे सांगितले होते. मुलीचा जन्म सी-सेक्शनच्या माध्यमातून झाला तेव्हा तिचे वजन केवळ 1 किलो 16 ग्रॅम होते असे अबीगेलच्या आईने सांगितले आहे. अबीगेलने जन्मानंतरचे आठ आठवडे रुग्णालयातच घालविले होते.
या आजाराबद्दल आम्ही कधीच ऐकले नव्हते. मुलीच्या या गंभीर आजाराबद्दल कळताच रुग्णालयातील पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या स्वतःच्या कारमध्ये दोन तासांपर्यंत रडल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.
अबीगेलची प्रकृती आता चांगली असली तरीही ती अनेक गुंतागुंतींना तोंड देत आहे. ती चालू शकत नाही, तसेच तिची दृष्टीही कमजोर असल्याने तिच्यासाठी उपयुक्त चष्मा शोधत आहोत. विशेष गरजा असणारी मुले आणि सामान्य मुलांदरम्यान संतुलन साधणे अवघड आहे. अबीगेलची मोठी बहिण सामंथाला स्वतःच्या बहिणीला मदतीची गरज असल्याचे माहित असल्याने ती अधिकाधिक वेळ तिच्यासोबत घालवत असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले आहे.