स्व. बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांची 152 वी जयंती कार्यक्रम
वार्ताहर / औंध
लोकहितवादी राजे स्व. बाळासाहेब महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचा लोककल्याणाचा वारसा जतन करण्यासाठी मी कटिबद्ध राहिन अशी ग्वाही औंध संस्थानच्या स्नुषा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. औंध येथे स्व. श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी उर्फ बाळासाहेब महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त शंकरराव खैरमोडे, हणमंतराव शिंदे, आब्बास आत्तार, राजेंद्र माने , प्रशांत खैरमोडे, बापूसाहेब कुंभार, दीपक नलवडे, शाकिर आत्तार, प्रदिप कणसे, प्रा. संजय निकम, रमेश जगदाळे, श्रीपाद सुतार, भरतबुवा यादव, ग्रामस्थ उपस्थित होते.
गायत्रीदेवी म्हणाल्या कि स्व. बाळासाहेब महाराज हे कलाप्रेमी राजे होते त्यांनी जतन केलेला अमुल्य ठेवा संस्थानच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे. लोकांच्या हिताला त्यांनी सदैव प्राधान्य दिले. त्यांनी जपलेला ठेवा जतन करण्यासाठी मी यापुढेही प्रयत्नशील राहिन. हणमंतराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. श्रीपाद सुतार यांनी आभार मानले.
Previous Articleकोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया : उध्दव ठाकरे
Next Article मास्क न वापरल्यास आता 500 रुपयांचा दंड









