ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
क्वीन्सलँड येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या दिवशीच भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने शतक झळकावले. गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या या कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये तब्बल 15 वर्षानंतर कसोटी सामना होत आहे. गुलाबी चेंडूत खेळवण्यात येणारा हा सामना गुरुवारी पहिल्याच दिवशी पावसामुळे सामना थांबविण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताने 1 बाद 191 धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये भारताच्या स्मृती मंधानाने शतकी खेळी करत नवा विक्रम केला. गुलाबी चेंडूत शतक झळकाणारी ही पहिलीच भारतीय महिला ठरली.









