मुंबई
स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी रिलायन्सच्या जियोने जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते. लिलाव भागीदारीत भाग घेताना सर्वाधिक बोलीची रक्कम रिलायन्स जियोने जमा केली असल्याचे समजते. एकंदर पाहता 22 दूरसंचार सर्कलचा विचार करता प्रत्येक बँडमध्ये स्पेक्ट्रमचा ब्लॉक खरेदीसाठी कमीत कमी 7 हजार 800 कोटी रुपये मोजले असावेत, असेही सांगितले जात आहे. त्याबाबत नेमकी स्पष्टता मात्र झालेली नाही. जियोनंतर भारती एअरटेलने स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. तर त्यानंतर तिसऱया क्रमांकावर व्होडाफोन आयडीया आहे. भारती एअरटेल जुन्या स्पेक्ट्रम परवान्याचे नूतनीकरण करण्याबरोबरच नवे स्पेक्ट्रम खरेदी करण्याचा विचार करते आहे.









