प्रतिनिधी\ पणजी
गोव्यातील प्रतिथयश कलाकार आणि राष्टाचे प्रतिनिधीत्व करणाऱया कलाकारांचा सन्मान करण्यात आला. स्पंदन या शब्दात मंत्रशक्ती आहे. हा शब्द एकल्यावर मन उत्साहीत होते. कलाकारांचा सन्मान केल्यावर त्यांच्या आयुष्यभराच्या कलेची खऱया अर्थाने साधना होते. स्पंदनमध्ये जुनी आणि नवी पिढी अशा दोन्ही पिढीतील कलाकारांचा सन्मान केला असून त्यांचे कलेचे माध्यम जरी वेगवेगळे असले तर त्यांची उद्दीष्ट आनंद हे एकच असल्याचे उद्गार ज्येष्ठ समिक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी काढले.
स्पंदन ग्लोबल आर्ट ऍण्ड कल्चरल फ्ढाऊंडेशन गोवा आयोजित ‘स्पंदन सहावे वार्षिक जागतिक कला महोत्सव गोवा’ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी चित्रकार संजय हरमलकर, आनंद विकास, नागेश सरदेसाई आणि नरेश मडगांवकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीता तोरणे यांनी केले.
महोत्सवात स्पंदन आर्टीस्ट ऑफ्ढ द इयर अवॉर्ड नवी दिल्ली येथील शिखा मामगेन, नवी दिल्ली येथील पूजा सटी बहुगुना आणि बंगळुर येथील सरबानी बोस तर ‘स्पंदन युथ ऑफ्ढ इंडिया अवॉर्ड’ गोव्याचे आदित्य हरमलकर व ‘स्पंदन किड्स ऑफ्ढ इंडिया अवॉर्ड’ गोव्याचे तन्मय खर्बे यांना ‘स्पंदन सामाजिक पुरस्कार (कला)’ याअंतर्गत देण्यात आले. तसेच इतर पुरस्कारांमध्ये ‘स्पंदन आजीवन कतृत्व पुरस्कार’ गोव्याचे प्रीन्स जेकॉब फ्ढर्नांडिस, ‘स्पंदन सामाजिक सर्जनशील पुरस्कार’ गोव्याच्या शकुंतला भरणे आणि गोव्याचे अवधुत च्यारी यांना देण्यात आला. या कलाकारांना मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
महोत्सवात ‘106व्या स्पंदन कला अविश्वसनीय प्रतिभा-8’ कलाप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले असून दि. 5 जानेवारीपर्यंत ते सर्वांसाठी खुले असणार आहे. यामध्ये नवी दिल्ली येथील पुजा बहुगूना, जमशेदपूर येथील मुक्ता गुप्ता, नवी दिल्ली येथील मान्सी गोयल, नवी दिल्ली येथील नविता, म्हापसा येथील नेहा राणी आणि नवी दिल्ली येथील शिखा ममगेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.









