वृत्तसंस्था / बेंगळूर
भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नूकरपटू तसेच अनेक वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा पंकज अडवाणी याला कोरोनाची बाधा झाली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत त्याला थंडी आणि ताप जाणवू लागला त्यानंतर कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. पंकज अडवाणीने आतापर्यंत 24 वेळा स्नुकरचे विश्वविजेतेपद मिळविले आहे. पंकज अडवाणीला काही दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.









