वार्ताहर /तवंदी :
स्तवनिधी येथील वार्षिक विशाळी यात्रा 24 व 25 जानेवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 24 रोजी पहाटे ब्रह्मदेवाला जलाभिषेक, तुपाचा अभिषेक, सकाळी ध्वजारोहण, मानस्तंभासमोर पंचामृत, दुपारी ब्रह्मदेवास तेल, शेंदूर अभिषेक, सायंकाळी पालखी महोत्सव होणार आहे. 25 रोजी जलाभिषेक, पंचामृत अभिषेक, सकाळी ब्रह्मदेवास तेल, शेंदूर अभिषेक, दुपारी 3 वाजता रथोत्सव, सायंकाळी आरती झाल्यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांसाठी निपाणी बसस्थानकातून दिवसभर बसेसची सोय करण्यात आली आहे. यात्रेसाठी कर्नाटक-महाराष्ट्रातून लाखांहून भाविक येतात. तरी जैन-जैनेत्तर बांधवांनी उपस्थित राहून श्री क्षेत्रपाल दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र कमिटीचे सचिव बाळासाहेब मगदूम यांनी केले आहे.