अनारकली कुर्ता किंवा ड्रेस कोणत्याही ओकेजनची शान ठरतो. हा पायघोळ ड्रेस दिसतोही खूप छान. पण उंची आणि शरीरयष्टीनुसार अनारकलीची निवड केली तर तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक खुलू शकतं.
* उंची कमी असणार्या स्थूल मुलींनी काळ्या किंवा गडद रंगाच्या अनारकलीची निवड करायला हवी. तसंच वरच्या भागावर नक्षीकाम असणारा आणि घेर प्लेन असणारा अनारकली या मुलींना शोभून दिसेल. प्लेन अनारकलीमुळे तुम्ही उंच दिसता.
* कमी उंचीच्या पण स्थूल नसणार्या मुली प्लेन चोळीचा घेरवाला अनारकली घालू शकतात. पोलका डॉटवाला घेरदार अनारकलीही खूप छान दिसेल. थोडंफार नक्षीकाम केलेला अनारकलीही घेता येईल. या ड्रेसमध्ये तुम्ही स्टायलिश आणि उंच दिसाल. तुम्ही कोणत्याही रंगाचे अनारकली विकत घेऊ शकता. * उंच आणि बारीक मुलींवर कोणतेही कपडे शोभून दिसतात. तुम्ही बारीक असाल आणि तुम्हाला उंचीचं वरदान लाभलं असेल तर काळजीचं कारणच नाही. अशा मुली की होल डिझाइनवाला पूर्ण बाह्यांचा अनारकली घालू शकतात. जास्त फॅशन करायची असेल तर बेल्टही बांधता येईल. कॉन्ट्रास्ट रंगांचा अनारकली निवडा. हेवी वर्क किंवा नक्षीकाम केलेले अनारकली घालता येतील. लग्न किंवा सणासुदीसाठी अनारकली खरेदी करणार असाल तर हेवी वर्कवाला अनारकली घ्या. छान ट्रेंडी अनारकली घ्या आणि मस्त स्टायलिश दिसा.









