वृत्तसंस्था/ मुंबई
स्कोडा इंडियाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदीचा प्लॅटफॉर्म सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या तमाम ग्राहकांना उपलब्ध करून दिलाय. वर्षाच्या प्रारंभी सुरू केलेल्या या विनास्पर्श डिजिटल व्यवहाराच्या योजनेला ग्राहकांचाही प्रतिसाद लाभत असल्याचे सांगण्यात येते.
कोरोनाबाबत सर्वत्र काळजी घेतली जात असून ऑटो क्षेत्रातही स्कोडा इंडिया कर्मचारी, ग्राहक यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहे. इच्छुक ग्राहकांना आपली पसंतीची गाडी ऑनलाइन सहजपणे निवडता येण्याची पुरेशी व्यवस्था कंपीनीने केलीय. थेट संवादातून सल्ला, कारचे प्रत्यक्ष सादरीकरण हे गुगल मीटच्या माध्यमातून स्मार्टफोन्स, टॅब्लेटस् आणि कॉम्प्युटर्स यांच्या सहाय्याने 80 विक्रेत्यांमार्फत वरील सेवा ग्राहकांना पॅन इंडियाअंतर्गत दिली जात आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर झॅक हॉलीस यांनी योजनेवर प्रकाश टाकताना सांगितलं की, काँटॅक्टलेस प्रोग्रॅम हा तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनी राबवत असून ग्राहकांपर्यंत विक्री व सेवा उत्तमपणे दिली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्याबाबतीत सरकारच्या लढय़ासोबत कंपनी असून आवश्यक ती सर्व खबरदारी कंपनी घेत असल्याचा दावा त्यांनी केला. www.buyskodaonline.co.in या संकेतस्थळाला भेट देऊन ग्राहकांना बुकिंग करता येतं व इतर माहितीही मिळवता येते.









