अंजली बरोट प्रियकरासोबत विवाहबंधनात
‘स्कॅम 1992’ फेम अभिनेत्री अंजली बरोटने विवाह केला आहे. अंजलीने प्रियकर गौरव अरोरासोबत विवाह केला आहे. समाजमाध्यमांवर या विवाहाची काही छायाचित्रे दिसून आली आहेत.
अंजलीने ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमदये हर्षद मेहताची पत्नी ज्योती यांची व्यक्तिरेखा साकारली होती. अंजलीने स्वतःच्या विवाहाची अनेक छायाचित्रे इन्स्टाग्रमावर प्रसारित केली आहेत. अंजली अन् गौरवचा विवाह 16 फेब्रुवारी रोजी पार पडला आहे.









