वृत्त संस्था/ राजकोट
भारताच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच सौराष्ट्रचा रणजी संघातील युवा क्रिकेटपटू अवी बारोतचे वयाच्या 29 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.
2019-20 क्रिकेट हंगामात रणजी करंडक जिंकणाऱया राजस्थान संघामध्ये बारोतचा समावेश होता. बारोतने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत यापूर्वी हरियाणा आणि गुजराथ संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर तो राजस्थान संघामध्ये दाखल झाला. शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे रूग्णालयात निधन झाले. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे बारोतला श्रद्धांजली वाहण्यात आली. बारोत हा उपयुक्त फलंदाज तसेच फिरकी गोलंदाजही होता. त्याने आपल्या प्रथमश्रैणी क्रिकेटमध्ये 38 सामने, लिस्ट अ प्रकारातील 38 सामने तसेच 20 टी-20 सामने खेळले आहेत. बारोत हा यष्टीरक्षक आणि फलंदाजही होता. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 1547, लिस्ट अ प्रकारामध्ये 1030 आणि टी-20 प्रकारात 717 धावा जमविल्या. 2011 साली बारोत भारताच्या 19 वर्षाखालील युवा संघाचा कर्णधार होता. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी बारोतला श्रद्धांजली वाहिली.









