ऑनलाईन टीम / कोलकाता :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या परिवारातील दोन सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गांगुलींचा मोठा भाऊ स्नेहाशिष यांची पत्नी मोम गांगुली आणि सासूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
स्नेहाशिष यांची पत्नी मोम गांगुली आणि सासुवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गांगुली कुटुंबाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. स्नेहाशिष बंगाल क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव आहेत. बंगाल संघासाठीही ते क्रिकेट खेळले आहेत.









