कोविडमुळे पेट्रोलिय उत्पादनांत मोठी घट
वृत्तसंस्था/ रियाध
चालू वर्षातील दुसऱया तिमाहीमध्ये सौदी अरेबियाची सरकारी खनिज तेल कंपनी सौदी अराम्कोचा नफा हा 73 टक्क्मयांनी घटला आहे. कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे तेलाची मागणी आणि किमत यांच्यात घट होत गेल्यामुळे अराम्कोच्या तेल विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले आहे. याच कारणामुळे कंपनीच्या नफ्यात घसरण होत गेल्याची नेंद करण्यात आली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दुसऱया तिमाहीत निव्वळ नफा घसरुन 24.6 अब्ज रियाल म्हणजे 6.57 अब्ज डॉलवर राहिला आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा याच कालावधीत 24.69 अब्ज डॉलर होता. तसेच कंपनीने दुसऱया तिमाहीत 18.75 डॉलर लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
घसरणीची प्रमुख कारणे
कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे कच्चे तेल, नैसर्गिक गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनाची मागणी मोठय़ा प्रमाणात घसरली आहे. तसेच जगातील प्रमुख तेल कंपन्यांचा नफा हा मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याची नोंद केली आहे. सौदी अराम्कोचे सीईओ अमीन नसीर यांनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार जगात सर्वत्र आलेल्या कोविडच्या संकटामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.