ऑनलाईन टीम / रियाध :
सौदी अरेबियात अकरा भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सौदीतील भारतीय दुतावासाने यासंदर्भात पत्रक काढून वृत्तसंस्थाना माहिती दिली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सौदीतील मदिना येथे चार, मक्का येथे तीन, जेद्दाह येथे दोन, रियाध आणि दमाम या ठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भारतात लॉकडाऊनमुळे हवाई प्रवास पुढे ढकलल्याने भारतीय नागरिक तिथे अडकून पडले आहेत. सौदी अरेबियातून भारतीयांना बाहेर काढण्याचा सध्या कोणताही निर्णय झालेला नाही.
कोरोनामुळे जे रुग्ण सौदीत अडकले आहेत, त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. त्यांच्या जेवणाची आणि औषधोपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सौदीमध्ये असलेल्या भारतीयांनी काळजी करु नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही भारतीय दुतावासाकडून करण्यात आले आहे.









