शहरात 51 तर ग्रामीणमध्ये 48 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर आणि जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी शहरात 51 तर ग्रामीणमध्ये 48 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. वाढणार्या रुग्णांचा आकडा पाहता आता सोलापूरकरांनी दुर्लक्ष करुन चालणार नाही. मास्क न वापरणार्यांवर प्रशासनाकडून कारवाई सुरु आहे. शहर आणि जिह्यातील एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 779 इतकी झाली आहे.
सोलापूर शहर हद्दीत शुक्रवारी 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर सोलापूर ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 25 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.
सोलापूर शहरातील 768 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 717 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 51 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 37 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 358 इतकी झाली आहे. सोलापूर जिह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये 1816 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1768 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 48 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 27 पुरुष तर 21 स्त्रियांचा समावेश आहे. जिह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 हजार 421 इतकी झाली आहे. शहर आणि जिह्यातील एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 779 इतकी झाली आहे.
नियमांचे पालन आवश्यक कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सोलापुरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. सोलापूरकरांनी सर्व नियमांचे पालन करायला हवे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढला नाही, तर पूर्णपणे लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही. रुग्णांचा आकडा वाढू नये, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यायला हवी.









