प्रतिनिधी / सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील जिल्हा परिषद शाळेला सीईओ दिलीप स्वामी यांनी अचानक भेट देऊन पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधले.
लसीकरणाच्या ड्रायरनच्या निमित्ताने होटगी येथे जिल्हाधिकारी यांच्यासह सीईओ दिलीप स्वामी व इतर आधिकारी गेले होते. त्याच वेळी सीईओ यांनी जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देऊन संपूर्ण शाळेची पाहणी केले. तेथील पालक व लहान मुलांशी संवाद साधले. या अचानक भेटीने माञ शाळेतील कर्मचारी माञ गोंधळून गेले होते. तसेच अधिकार्यांनाही धडकी भरली होती.









