सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रेस्टॉरंट व भोजनालय रात्री बारा वाजेपर्यंत व इतर सर्व आस्थापना रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवार दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी काढले आहे. त्याच बरोबर शहरातील नाट्यगृह चित्रपटगृह 22 ऑक्टोंबर पासून सुरु होतील.
राज्य शासनाने मंगळवारी ब्रेक द चैन अंतर्गत सुधारित आदेश काढले होते. त्यानुसार मनपा आयुक्तांनी बुधवारी आदेश जारी केले आहेत.यापूर्वीच्या आदेशात नमूद केल्यानुसार कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना लसीकरण करून घेणे, मास्कचा वापर करणे ,वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे असे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर, थर्मल स्कॅनिंग , हँडवॉश, सॅनीटायझर या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिला आहे.









