मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती, बरे झाल्याने 71 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात शनिवारी नव्याने 66 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 71 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
सोलापूर शहरात शनिवारी 494 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 66 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 428 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 66 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 35 पुरुष तर 31 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8251 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 78395
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8251
प्राप्त तपासणी अहवाल : 78395
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 70144
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 467
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 970
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 6814









