मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
आज 51 कोरोना पॉझिटिव्ह तर चार रुग्णांचा मृत्यू
५०२ जणांचा मृत्यू, बरे झाल्याने 30 रुग्णांना सोडले घरी
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात रविवारी 9 हजार कोरोनाबाधितांचा टप्पा पार झाला, तर आतापर्यंत 502 जणांचा मृत्यू झाला. आज नव्याने 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 30 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिली.
सोलापूर शहरात रविवारी 474 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 423 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 51 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 34 पुरुष तर 17 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9044 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 85673
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9044
प्राप्त तपासणी अहवाल : 85673
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 76629
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 502
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 829
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7713