तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात शनिवारी नव्याने 58 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने 38 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
सोलापूर शहरात शनिवारी 1117 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1059 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 58 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 29 पुरुष तर 29 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6283 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 55975
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6283
प्राप्त तपासणी अहवाल : 54975
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 49692
एकूण मृतांची संख्या : 397
रुग्णालयात दाखल 1188
बरे 4698









