एकाच दिवशी जिल्ह्यात 9 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात बुधवारी 14 तर ग्रामीण भागात 330 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 9 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नवे कोरोनाबाधित 330 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 08 रुग्णांचा मृत्यू तर 451 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 330 पैकी 207 पुरुष, 123 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2902 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 30 हजार 293 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 2 हजार 504 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 6769 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 6439 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 330 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2902 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 24 हजार 887 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
सोलापुर शहरात नव्याने 14 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 21 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने 1 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापुर शहरात 2260 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2246 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 14 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 4 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 459 झाली आहे.









