प्रतिनिधी / वैराग
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. यातच वैरागमध्येही सहा रुग्ण सापडले असताना त्यांच्या संबंधित कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात येत आहे, मात्र वैरागमध्ये क्वारंटाइन सेंटर नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करून वैराग येथे पूर्वीप्रमाणेच सेंटर सुरू करावे.
याबाबत माहिती अशी की वैरागमध्ये अद्यापपर्यंत सहा कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी एक रुग्ण बरा होऊन त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर एक रुग्ण मयत आहे, चार रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांना व सहकाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येते. या अगोदर वैरागमध्ये क्वारंटाइन सेंटर होते परंतु सदर सेंटर बंद करण्यात आल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांच्याकडे वैरागमध्ये क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याची मागणी वैरागकरांनी केली आहे.
या मागणीची तात्काळ दखल घेत माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैरागमध्ये तात्काळ क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. वैराग येथील साई आयुर्वेदिक महाविद्यालय येथे सदर क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी ४५ खोल्या ताब्यात घेण्यात आल्या असून प्रत्येक खोलीत दोन म्हटले तरी ९० लोकांची राहण्याची सोय येथे होणार आहे. अशी माहिती वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत गुंड यांनी सांगितले दिली. तसेच सध्या वैराग येथील अकरा जण बार्शी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये वास्तव्यास असल्याचे वैरागकरांच्या मागणीची तात्काळ दखल घेत नामदार टोपे यांनी क्वारंटाइन सेंटर सुरु करण्याचे आदेश दिल्याबद्दल वैरागकरांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वैराग येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली









