प्रतिनिधी / सोलापूर
वारंवार मराठा समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणारे काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार यांच्याविरोधात आज सोमवारी सकल मराठा समाजाने सोलापूरच्या काँग्रेस भवन येथे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला.
जालन्यात जावून गायकवाड आयोगाचा मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट बोगस आहे. असे वक्तव्य करून तमाम मराठा समाज व विधिमंडळ व गायकवाड आयोगा तसेच उच्च न्यायालयाच्या अवमान करून वडडेट्टीवर यांनी जो अपमान केलाय त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस भवन समोर जोडेमार आंदोलन करण्यात आले. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मुर्दाबाद वडेट्टीवार मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
तर सोलापूर बरोबर राज्य काँग्रेसमुक्त करू
वारंवार मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य करणारे विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आज काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करत आहोत,वेळ पडली तर तुमच्या घरात घुसून आंदोलन करू तुम्ही आमच्या नादाला लागू नका असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे. मराठा समाजामुळे सोलापूर जिल्ह्यात व राज्यात काँग्रेस प्रबळ आहे. जर आमच्या नादाला लागाल तर आगामी निवडणुकीत सोलापूर जिल्ह्या बरोबर राज्यातील काँग्रेस मुक्त करू माऊली पवार- समन्वयक सकल मराठा समाज