तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगच्या महिला सरपंच त्यांचे पती आणि ग्रामसेवकांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. महिला सरपंच महानंदा दुधगी, त्यांचे पती श्रीशैल दुधगी व ग्रामविकास अधिकारी दस्तगीर नदाफ या तिघांनी फिर्यादी शांतकुमार नामदेव गायकवाड (वय ३२ रा वळसंग) यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वळसंग येथील नामदेव गायकवाड हे वळसंग ग्रामपंचायत येथे सफाई कामगार म्हणून जून २०२० मध्ये सेवा निवृत्त झाले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा फिर्यादी शांतकुमार गायकवाड सुद्धा वडिलांसोबत सफाई कामगाराचे काम करायचे. २०१८ पासून सरपंच आणि ग्रामसेवक जे सांगतील ते शांतकुमार काम करायचे. वडील नामदेव गायकवाड यांच्या सेवा निवृत्तीनंतर अनुकंपाखाली मुलगा शांतकुमार यांना कामावर घेतो असे आश्वासन दिल्याने शांतकुमार हे सरपंच आणि ग्रामसेवक सांगेल ते काम करू लागले. या कामावर कायम नियुक्ती द्या असे शांतकुमार सतत ग्रामपंचायत प्रशासनास मागणी केली असता कायम करू असे सतत आश्वासन देण्यात आले. पण जून महिन्यात सरपंच महानंदा दुधगी त्यांचे पती श्रीशैल दुधगी व ग्रामविकास अधिकारी दस्तगीर नदाफ यांनी शांतकुमार यांना कामावर येऊ नकोस असे आदेश दिले.
दि ३ जून २०२१ रोजी शांतकुमार हे वळसंग ग्रामपंचायत कार्यालयात गेले त्यावेळेस सरपंच महानंदा दुधगी त्यांचे पती श्रीशैल दुधगी व ग्रामविकास अधिकारी दस्तगीर नदाफ हे उपस्थित होते. शांत कुमार यांनी वरील तिघांना वडिलांच्या जागेवर कायमस्वरूपी कामावर घ्या असे विनंती केली असता तर महिला सरपंच महानंदा दुधगी म्हणाल्या “तुला काय करायचे आहे ? तू मागासवर्गीय आहेस तू गटारी साफ कर आणि तू या गावात राहण्याच्या लायकीचा नाहीस. तू मागासवर्गीय असून तुझा इतका कसा रुबाब,का तुझी लायकी विसरला ? सरपंच पती श्रीशैल दुधगी हे ” तुझी गावात वसुली करण्याची लायकी नाही,तू तुझ्या जातीच्या लायकीप्रमाणे रहा नाहीतर जिवंत सोडणार नाही. तेव्हा ग्रामसेवक दस्तगीर नदाफ हे सुद्धा शांतकुमार यांना सरपंच आणि माजी सरपंच बोलतात ते बरोबर आहे. असे बोलत तिघे शांतकुमारच्या अंगावर येऊन जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी काल, २३ जून रोजी फिर्यादी शांतकुमार गायकवाड यांनी सरपंच, त्यांचे पती व ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात अट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड हे करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









