प्रतिनिधी / कुर्डुवाडी
लऊळ (ता.माढा) येथून दवाखान्यासाठी कुर्डुवाडी ला निघालेल्या महिलेने लऊळ शिवारातील सीना माढा उपसा सिंचन कॅनोल नजिक असणाऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना दि.२४ रोजी सकाळी ९ वा. सुमारास घडली. रुक्मिणी नवनाथ देवकर (वय ४५)असे सदर महिलेचे नाव आहे.नेमके वटपौर्णिमेचा सणा दिवशीच महिलेने आत्महत्या केल्यामुळे परिसरातील महिलावर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेचे पती हे बुधवारी सायंकाळी अर्धांगवायुचा दुसरा झटका आल्याने कुर्डुवाडीतील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे सदरची महिला गुरूवारी सकाळी ९ च्या दरम्यान घरातून दवाखान्यात जाते असे मुलांना सांगून निघाली होती.
दरम्यान शिवारात रस्त्यात असलेल्या विहिरीच्या कठड्यावर चप्पल ठेऊन तिने विहिरी उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले व सदर घटनेचा पंचनामा करुन महिलेला विहिरीतून बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. तिच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









