तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्यामुळे सोलापुरातील कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी’ चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज रविवारी लापूरचा जिल्ह्याचा दौरा केला असून दुपारी सव्वा एकच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले आहे. यावेळी सोलापुरात पोलिसांचा मोठा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सोलापुरातील जिल्हा नियोजन भवनमध्ये लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर कोरोना आणि लॉकडाऊनबाबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर साडेतीन वाजता प्रसार माध्यमाशी खासदार पवार बोलणार आहेत.









