प्रतिनिधी / वैराग
वैराग येथे संपुर्ण शहरात प्रत्येक नागरिकास अँटिजेन चाचणीस सुरवात करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार किरण जमदाडे, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर, ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे, वैद्यकिय अधिकारी पवन गुंड, अधिकक्ष विलास मस्के,तलाठी सतिश पाटिल, आरोग्य सेवक शिवाजी आवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आज शिवाजी नगर, खंडोबा वेस, दत्त नगर, शिवशिल्प काँलनी, इंदिरा नगर आदि अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये फक्त चौदा रूग्ण पाँझिटीव्ह आढळुन आले. या उपक्रमामध्ये अंगणवाडी सेविका, अशा वर्कर, वैद्यकिय व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
तसेच आजपासुन जो मास्क बांधणार नाही त्यास कोणत्याही दुकानात कोणतीही वस्तु दिली जाणार नाही.हा प्रयोग पुणे विभागात ग्रमपंचायत स्तरावर सर्व प्रथम वैराग येथे राबवण्यात आला असुन, कोरोनाबद्दल याप्रकारे जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम राबण्यात येत असल्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले.
दरम्यान आज शहरात मास्क नाही तर चहा,नाष्टा, किराणा,औषध, आदी कोणत्याही स्वरूपांच्या वस्तु मिळणार नसल्याचे फ्लेक्स अनेक ठिकाणी लावण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक दुकानावर स्टिकर लावण्यात आले.
मास्क वापरणे हीच लस
सध्या तरी मास्क व सामाजिक अंतर हाच कोरोनावर पर्याय आहे. त्यामुळे मास्क हीच लस समजुन सर्व दुकानदारांनी मास्कविना आलेले ग्राहक करू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल असे ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.









