सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर मार्केट यार्डात सरकारी तांदूळ असल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक गोडावून आणि एक ट्रक सील तर एक ट्रक जप्त केला आहे़ याच बरोबर दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली़.
मार्केट यार्डात शेख नामक इसमाच्या गोडाऊनमध्ये सरकारी धान्य असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली़. या माहितीवरून
शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्या गोडाऊनची पहाणी केली़. दरम्यान त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला याबाबत पत्राव्यहार केला आहे. पण त्या विभागाकडून उत्तर न आल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी गोडावून सील केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली़. या गोडावून मधील तांदुळ हे काळ्या बाजारासाठी जात असल्याचा संशय ही व्यक्त करण्यात आला असून दोघा संशयीतानाही ताब्यात घेण्यात आले आहे़.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









