प्रतिनिधी / सोलापूर
15 ऑगस्ट रोजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी महापालिकेतील कामगारांसाठी अनेक घोषणा केल्या. त्या कामगार हिताच्या न्यायिक घोषणेला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामूळे महापौर फक्त घोषणाच करतात, पुढे काय ? असा प्रश्न उपस्थीत करत सदरच्या घोषणा पुर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी सोमवारी दिला.
15 ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून महापौर श्रीकांचना यन्नम यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करणे, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे अंतिम यादी जाहीर करणे, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा टक्यानी वाढ करणे, आधी घोषणा केल्या होत्या. कामगार हिताच्या दृष्टीने मागील तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीला न्याय देण्याचा काम महापौरांनी केले होते.
परंतू प्रशासनाने महापौरांच्या घोषणेला केराची टोपली दाखवली आहे. महापौरांनी केलेल्या घोषणेच्या संदर्भात ठोस अशी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात झाल्या नाहीत. महापौर यन्नम यांचे याकडे दुर्लक्ष आहे. तरी पुढील काळामध्ये प्रशासनाने महापौरांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्याकरिता हालचाली सुरू कराव्यात. अन्यथा कामगार कृती समितीच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला.
Previous Articleसणासुदीच्या काळात ऑडी विक्री वाढविण्याच्या तयारीत
Next Article प्रमुख बंदरांमधील उलाढालीत घसरण









