प्रतिनिधी/करमाळा
बेकायदेशीर गांजा विक्री प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली. अनिल वासुदेव लवळे असे या जामिनावर सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, गांजा विक्री करताना करमाळा तालुक्यातील मलवडी येथील अनिल लवळे यास करमाळा पोलिसांनी अटक केली होती. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून १८५० ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेतले होते. यानंतर त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायदा ( NDPS Act ) चे कलम ८, कलम २० या प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
अनिल लवळे याने ॲड. राहुल सावंत व ॲड. अविनाश जाधव यांच्या मार्फत बार्शी येथे विशेष न्यायाधीश NDPS स्पेशल कोर्ट मे. A. B. भस्मे यांच्या कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन अँड. राहुल सावंत व ॲड. अविनाश जाधव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी अनिल लवळे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. याकामी आरोपी तर्फे ॲड. राहुल सावंत (करमाळा) व ॲड अविनाश जाधव ( बार्शी ) यांनी काम पाहिले. तर सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









