प्रतिनिधी / बार्शी
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि “अ” वर्ग नगरपालिका बार्शी नगरपालिकेच्या तिजोरीला कोरोना झाला आहे अशी जाहीर टीका आज विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे भरलेल्या बोर्ड मीटिंग प्रसंगी केली. या झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये ठेकेदाराला कामाची बिले देण्याचा ठराव आला असता विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी बार्शी नगर परिषदेचे अर्थ व वित्त विभागाचे लेखा अधिकारी राठोड यांना नगरपालिकेच्या नफा फंडात किती रक्कम शिल्लक आहे असे विचारले असता वित्त व लेखा अधिकारी राठोड यांनी सांगितले की खात्यावर फक्त पाच लाख रुपये शिल्लक आहे. यावेळी नागेश अक्कलकोटे यांनी सभागृहांमध्ये सांगितले की खात्यात पाच लाख शिल्लक असताना 15 कोटीची ठेकेदारांची देयक देणे बाकी आहे. त्यामुळे नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असून आता नगर परिषदेच्या तिजोरीला कोरोना झाला की काय असे सांगत टीका केली. लॉकडाऊननंतर बार्शीनगर परिषदेची ही पहिली सभा झाली जी बार्शी नगरपरिषदेच्या सभागृहाच्या बाहेर भरली होती. कोरोनामुळे शारीरिक अंतर ठेवण्यासाठी ही सभा बार्शी नगरपरिषदेच्या कैलासवासी भाऊसाहेब झाडबुके सभागृहात न भरवता बार्शीच्या मध्यवर्ती असणाऱ्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह मध्ये भरविण्यात आली. यात एकूण सर्व प्रकारचे 40 विषय मांडण्यात आले यावेळी पीठासीन सभापती म्हणून नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी काम पाहिले.
बार्शी नगरपरिषदेच्या या झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये बार्शी नगरपालिकेने भवानी पेठ येथे बांधलेल्या नवीन व्यापारी संकुलास वीर शिरोमणी महाराणा प्रताप व्यापारी संकुल असे नाव देण्याचे ठरले. त्याचबरोबर बार्शी नगर परिषदेच्या विभागातील वीस वर्षे पूर्ण झालेल्या आणि निवृत्ती घेतलेल्या 22 कर्मचाऱ्यांच्या वारसांना बार्शी नगर पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी विविध चालू असणारी रस्त्याचे कामे याच्या अंदाजपत्रक बाबत विषय पटला समोर आला असता विरोधी पक्षाने या कामाचे अंदाजपत्रक कसे बनवले याबाबत विचारणा केली असता कोणत्याही कामावर बांधकाम विभागाचे अधिकारी गेले नसल्याचे उघड झाले यावेळी अक्कलकोटे यांनी सभागृह समोर मांडत असताना अनेक अधिकारी फक्त आपल्या केबिनमध्ये बसून अंदाजपत्रक बनवतात प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कामाची पाहणी करत नाहीत तसेच संबंधित ठेकेदारांची बिले देताना सुद्धा काम पूर्ण झाले आहे का नाही हेही पाहत नाहीत आणि कामाचे दर्जा न पाहता बिल पास केले जातात अशीही टीका अक्कलकोटे यांनी केली.
बार्शी शहरातील बार्शी नगर परिषदेने विकसित केली उद्याने, बागा या चालवण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्याचे किंवा साहित्य पुरवणे यासाठी बागांसाठी वार्षिक 65 लाख रुपयांची तरतूद करण्याचा विषय पाटला समोर आल्यानंतर यास विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी विरोध दर्शविला कारण नगर पालिकेच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट असताना वर्षाला 65 लाख रुपयांचा बोजा टाकण्याचे काही जरूरी नाही असे मत अक्कलकोटे यांनी व्यक्त केले आणि तसेच पुढे सांगताना म्हणाले म्हणाले की बार्शी नगरपरिषदेच्या बागा या बार्शीतील विविध सामाजिक संस्था यांना चालविण्यासाठी देण्यात याव्यात मात्र या संस्थांना बागा देताना कोणत्याही जाचक अटी लावू नयेत. यानंतर नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी सांगितले की या बागा चालविण्यासाठी घ्याव्या असे तीन वेळा प्रसिद्धी करण केले आहे मात्र कोणतीही संस्था समोर आली नाही तेव्हा अक्कलकोटे यांनी सांगितले की फक्त प्रसिद्धी करण करून चालणार नाही तर त्या सर्व सामाजिक संस्थांची एक बैठक लावून त्यांना विनंती करणे गरजेचे आहे. या झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये सर्व नगरसेवकांना शारीरिक आंतर राखण्यासाठी अंतर ठेवून बसविले होते तर सभागृहात प्रवेश करणार्या प्रत्येकाला मास्क देण्यात आले होते आणि बैठक सुरू होण्याच्या आधी हे सभाग्रह निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.
बार्शीत पाच नाना राऊत आहेत
यावेळी बोर्ड मिटिंग मध्ये एका विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर ज्ञानेश्वर पवार या ठेकेदाराने त्यास खडी व मुरूम कमी दरात मिळत असून ती नाना राऊत मला देण्यास तयार आहेत त्यामुळे माझी अंदाजपत्रकीय रक्कम कमी करावी असा अर्ज केल्याचे बांधकाम अभियंता यांनी सांगितल्यानंतर अक्कलकोटे यांनी नगरसेवक नाना राऊत यांना रोखून बोलताना सांगितले की नाना राऊत यांनी बाकीच्या ठेकेदाराला जर स्वस्थ खडी व मुरूम दिला तर अनेक कामांची अंदाजपत्रके रक्कम कमी होईल तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला कारण नगरसेवक विजय राऊत यांचे टोपन नाव नाना राऊत असून त्यांचाही खडी आणि मुरूम चा व्यवसाय आहे आणि ते आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू आहे तेव्हा नगरसेवक पिनऊ काकडे यांनी सांगितले की बार्शी पाच नाना राऊत आहेत.









