प्रतिनिधी / बार्शी
श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांच्या कडून प्लाझमा थेरेपीसाठी सोलापूर जिल्ह्यात प्रथमच मान्यता मिळाली आहे. जागतिक महामारी कोव्हीड 19 रूग्णांना उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेली प्लाझमा थेरपीचा उपयोग कोव्हीड बाधित रूग्णांवर यशस्वीरित्या केला जाऊ शकतो. त्यामुळे कोव्हीड रूग्णाना नवजीवन मिळण्याची शक्यताही आहे. मुंबई पुणे सारख्या महानगरात सध्या प्लाझमा दान करून कोव्हीड रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यात येत असतानाच बार्शी सारख्या निमशहरी भागातही इंडीयन रेडक्रॉस सोसायटी संचलीत श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला प्लाझमा थेरपीजची अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही बाब बार्शीकरांसाठी व जिल्ह्यातील कोव्हीड रूग्णांना मोठा दिलासा देणारी आहे.
सध्या शहर व सोलापूर जिल्ह्यात कोव्हीड 19 चे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोव्हीड 19 सारख्या असाध्य रोगावर अद्याप तरी प्रभावी लस किंवा औषध निघाले नाही. जगभर कोव्हीड 19 च्या लस व प्रभावी औषधासाठी संशोधन सुरू आहे. मात्र निश्चित असे प्रभावी व उपयुक्त ठरेल असे सद्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर कोव्हीड 19 चा पॉझिटीव्ह रूग्ण हॉस्पिटलमधून योग्य उपचार घेऊन पूर्णतः बरा झाल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच्या अॅन्टी बॉडीजची (प्रतिकार शक्ती) चाचणी घेतली जाते.
सदरची सुविधा बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला मिळवून देण्यासाठी बार्शीचे सुपुत्र व राज्याचे अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त अरूण उन्हाळे (मुंबई), पुण्याचे सह आयुक्त एस.बी पाटील व सोलापूरचे सहाय्यक आयुक्त भालेराव सर यांनी सहकार्य केले.
Previous Articleभारतात परतल्यावर सुरेश रैना म्हणाला…
Next Article बार्शीत अवतरले बाप्पा, राबवले विविध उपक्रम









