पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील सबजेल मध्ये शनिवारी 21 कैदी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली.
पंढरपुरातील सबजेल मध्ये शुक्रवारी चार कैद्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर त्यांची कोविड चाचणी घेण्यात आली. यामध्ये हे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर या कैद्यांच्या संपर्कात असणाऱ्या 46 कैद्यांची कोविड तपासणी शनिवारी करण्यात आली.
यामध्ये तब्बल एकवीस कैदी हे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सबजेल मधील आता कोरोना बाधितांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. कोरोना बाधित रुग्णांना वाखरी येथील एमआयटीच्या कोविड केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पंढरपूर सबजेल मध्ये एकूण 50 कैदी आहेत. यामध्ये निम्मे कैदी आता कोरोना बाधित असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशातच इतर कैद्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने प्रशासन पावले उचलत आहे.
Previous Articleनिर्यातविषयक सज्जतेत गुजरात अव्वल
Next Article सागरिका म्युझिककडून नव्या रूपात श्रावणमासी हर्षमानसी









