तरुण भारत संवाद प्रतिनिधी/पंढरपूर
पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय वाईकर यांचे कोरोनामुळे आज, सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.
संजय वाईकर हे दहा दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर तीन दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारपासून त्यांना मधुमेहाचा आणि रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. यामध्येच श्वसन विकार देखील उद्भवला. यातच त्यांचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला.
वाईकर हे गेल्या तीन वर्षापासून पंढरपूर शहर भाजपाचे अध्यक्ष होते. गेल्या वीस वर्षापासून पंढरपूरच्या पत्रकारितेमध्ये ते कार्यरत होते. येथील निर्भीड आपलं मत या दैनिकाचे संपादक देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









