जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
उच्च न्यायालय मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशास अनुसरून सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील सरपंच निवडी लांबणीवर पडणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज, सोमवारी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. सांगोला, पंढरपूर, माढा माळशिरस, अक्कलकोट, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर या तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान करमाळा, बार्शी मंगळवेढा, उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडी वेळापत्रकानुसार होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
सरपंच आरक्षण चुकीच्या पद्धतीने जाहीर झाल्याबद्दल सात तालुक्यामधील 14 गावांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने निकाल दिला असून त्यानुसार आता जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सात ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी लांबणीवर टाकल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायत साठी नुकतेच मतदान झाले असून मतमोजणी तर सरपंच निवडीचा कार्यक्रम निश्चित झाला 9, 11 आणि 13 फेब्रुवारी ही तारीख असून नवनिर्वाचित सदस्यांना न निवडीच्या अनुषंगाने नोटीस देण्यात आली. मात्र आता सात तालुक्यामधील सरपंच निवडीचा कार्यक्रम पुढे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच काढले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सुनावणी घेतल्यानंतर या 7 तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमाच्या देश स्वतंत्ररीत्या पारित करण्यात येईल असेही आदेशात नमूद केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









