एकाच दिवशी जिल्ह्यात 23 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात गुरूवारी 52 तर ग्रामीण भागात 888 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 23 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नवे कोरोनाबाधित 888 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 21 रुग्णांचा मृत्यू तर 1670 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 888 पैकी 489 पुरुष, 399 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2519 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 20 हजार 649 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 9 हजार 552 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे.
आज 5609 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 4721 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 888 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2519 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 8 हजार 578 जण बरे होऊन घरी गेली आहेत.