प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये. लिक्विड ऑक्सिजन, ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर आणि जंबो ऑक्सिजन सिलेंडरचा तत्काळ व सतत पुरवठा व्हावा म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समितीची स्थापना केली आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते यांची समितीचे समन्वय अधिकारी आहेत.
समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्यचे उपसंचालक प्रमोद सुरसे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त नामदेव भालेराव आणि एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी शिवाजी राठोड यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात व शहरात शासकीय रूग्णालये, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये अत्यवस्थ कोरोना रूग्ण आणि संशयित अत्यवस्थ रूग्णांना आयसीयु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी लिक्विड ऑक्सिजन, ड्युरा ऑक्सिजन आणि जंबो ऑक्सिजन सिलेंडरची तत्काळ, सतत आणि अधिक क्षमतेने पुरवठा होण्यासाठी समिती काम करेल.
समितीने पुढीलप्रमाणे कामे करणे अपेक्षित आहे
जिल्ह्यातील डीसीएचसी, डीसीएच व इतर रूग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा अव्याहत सुरू राहील, यासाठी पुरवठादार आणि कोविड केंद्रे, रूग्णालये यांच्याशी समन्वय ठेवणे. डीसीएचसी, डीसीएच व इतर रूग्णालयात रूग्ण संख्येनुसार ऑक्सिजन आणि सिलेंडरची मागणी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून निश्चित करून पुरवठादाराकडे पाठपुरावा करणे. वापरलेल्या ऑक्सिजनच्या दैनंदिन नोंदी अद्ययावत असल्याची पडताळणी करून नोंदी ठेवणे. ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित झाल्यास मागणी निश्चित करून पुरवठा तत्काळ उपलब्ध करून घेणे. जिल्ह्यात असलेल्या ऑक्सिजन प्लान्टला भेट देऊन इन्डस्ट्रीयल आणि मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्याचा अभ्यास करून मेडिकल ऑक्सिजन वाढविणे.
ऑक्सिजनच्या उपलब्धेसाठी आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे.ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित करणे.आवश्यकता भासल्यास इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील ऑक्सिजन पुरवठादार यांच्याशी संपर्क ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करून घेणे. ऑक्सिजन वितरकाशी समन्वय साधून नियमित पुरवठा होण्यासाठी प्रयतन् करणे. जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये आणि उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन लाईन बसविण्यासाठी समन्वय करणे. सिव्हिल हॉस्पिटलला लिक्विड ऑक्सिजन बसवणे आणि इतर दवाखान्यांना त्याचा पुरवठा याबाबत समन्वय.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









