यंदाही सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी
सर्वाधिक टक्केवारी 98.56 मोहोळ; सर्वात कमी 96. 31 टक्के करमाळा तालुक्याचा निकाल
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज, बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षीही सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल 97. 53 टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात मोहोळ तालुक्याने बाजी मारली असून या तालुक्याचा निकाल सर्वाधिक 98.3 टक्के निकाल लागला आहे जिल्ह्यात सर्वात कमी निकाल करमाळा तालुक्याचा 96. 31 लागला आहे.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष न करता एकमेकांना ऑनलाईन, फोनवरून शुभेच्छा दिल्या. तर आज बुधवारी पेढे घेण्यासाठी सोलापूर शहरातील मिठाई दुकानात पालकांनी मोठी गर्दी केली होती.
दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर आज बुधवारी राज्यभरात दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये, नेट कॅफे आणि स्वतःच्या कॅम्पुटरमध्ये दहावीचा निकाल पहिला. निकाल पाहिल्यानंतर एकमेकांच्या मित्र–मैत्रिणींना फोनवरून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान दहावी परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून 63 हजार 594 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी 63 हजार 193 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यामध्ये 61 हजार 633 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुकानिहाय दहावीचा निकाल
तालुका – टक्केवारी
सोलापूर शहर – 97.63 टक्के
अक्कलकोट– 96.43 टक्के
बार्शी -98.28 टक्के
करमाळा– 96.31 टक्के
माढा– 97.26 टक्के
माळशिरस-97.24 टक्के
मंगळवेढा -97.61 टक्के
मोहोळ– 98.56 टक्के
पंढरपूर -97.57 टक्के
सांगोला -97. 78 टक्के
रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल 81.58 टक्के
दहावी परीक्षेसाठी एकूण 5 हजार 848 रिपीटर विद्यार्थ्यांची नोंद होती . त्यापैकी 5 हजार 847 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून 4 हजार 770 विद्यार्थी पास झाले आहेत. 81. 58 टक्के निकाल लागला आहे.
सोलापूर जिल्ह्याचा निकाल 16.1 टक्क्यांनी वाढला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये सोलापूर जिल्ह्याने गतवर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालात तब्बल 16.1 टक्क्याने वाढ झालेली आहे. बारावी परीक्षा बरोबर दहावीच्या परीक्षेत ही यंदाच्या वर्षी मुलींनी बाजी मारली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









