राज्यभरातील ‘जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील’ 43 जनांच्या बदल्या
प्रतिनिधी / सोलापूर
राज्य शासनाने महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील राज्यभरातील ‘जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील’ 43 जनांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सामान्य रुग्णालय, सोलापूर येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. अशोक बोल्डे यांची नियुक्ती केली आहे.
डॉ. अशोक बोल्डे हे सध्या रत्नागिरी येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदी कार्यरत होते.
त्यानंतर विनंतीनुसार त्यांची सोलापूर येथे बदली केली आहे. यापूर्वी डॉ. बोल्डे यांनी मोहोळ येथे वैद्यकीय अधिक्षक पदी काम पाहिले आहे. त्यांची विनंतीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. प्रदीप ढेले यांच्या जागी नियुक्ती केली आहे. मात्र डॉ. ढेले यांची नियुक्ती रखडली असुन ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. अशोक बोल्डे हे सोमवारी रुजू होणार असल्याची चर्चा आहे.
Previous Articleपुणे विभागातील 4 लाख 40 हजार 681रुग्ण कोरोनामुक्त
Next Article दिल्लीत दिवसभरात 2,920 नव्या कोरोना रुग्णांची नोंद









