व्यापार्यासह ग्राहकांवरही दंडाची आकारणी
प्रतिनिधी / सोलापूर
सिध्देशवर पेठेतील जयपूर साडी सेंटरला मंगळवारी फौजदार चावडी पोलिसांनी टाळे ठोकले. कोरोना संसर्गाच्या पार्वभूमीवर नियम डावलून साडी विक्री करत असताना पोलिसांनी कारवाई केली. विशेष म्हणजे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांवरहि दंडाची कारवाई करण्यात आली.
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सुरु ठेवण्यास बंदी आहे. याबाबत शहरातील व्यापारी तसेच दुकानदारांना माहिती देण्यात आली आहे. तसेच सूचनांचे पालक करण्याविषयी सांगण्यात आले. दरम्यान, मंगळवारी सिध्देMवर पेठेतील जयपूर साडी संsटरमध्ये व्यापारी साडी विक्री करीत होता. पोलिसांनी तेथे छापा मारला. त्यावेळी आठ माfहला ग्राहक दुकानात खरेदी करताना आढळून आल्या. पोलिसांनी दुकान मालक अ. रशीद अ. कादर खतरी (वय 35, रा. सिध्देMवर पेठ, सोलापूर) विरुध्द कारवाई केली. नंतर पोलिसांनी जयपूर साडी सेंटरला टाळे ठोकले. दरम्यान पुढील आदेशापर्यंत हे दुकान बंद राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी ग्राहकांवर कारवाई करीत आठ हजार रुपये दंड वसूल केला. तर दुकान मालकावर दहा हजार रुपयांचा दंड आकारला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त (पाfरमंडळ) वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बाfहरट, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.









