तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
ग्रामीण भागात रविवारी 245, तर पालिका हद्दीत 26 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. एकाच दिवसात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 245 कोरोना रुग्ण आढळले, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 9 हजार 456 वर पोहोचल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. 1 हजार 110 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 245 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 865 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 245 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 161 पुरुष आणि 84 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 9 हजार 456 झाली आहे. शहारात नव्याने 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने 40 जणांना घरी सोडण्यात आल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 404 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 377 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 26 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 16 पुरुष तर 10 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 309 झाली आहे.
ग्रामीणमधील संख्या
एकूण तपासणी ः 73 हजार 93
पॉझिटिव्ह रुग्ण ः 9 हजार 456
प्राप्त तपासणी अहवाल ः 72 हजार 960
प्रलंबित तपासणी अहवाल ः 133
निगेटिव्ह अहवाल ः 63 हजार 305
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 266
रुग्णालयात दाखल बांधित ः 2 हजार 533
बरे होऊन घरी गेलेले ः 6 हजार 637
शहरातील संख्या
एकूण तपासणी ः 56 हजार 378
पॉझिटिव्ह रुग्ण ः 6 हजार 309
प्राप्त तपासणी अहवाल ः 56 हजार 378
प्रलंबित तपासणी अहवाल ः 00
निगेटिव्ह अहवाल ः 50 हजार 59
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 399
रुग्णालयात दाखल बांधित ः 1 हजार 172
बरे होऊन घरी गेलेलेः 4 हजार 738









