एका दिवसात 513 रुग्णांची वाढः 18 जणांचा उच्चांकी बळी, महापालिका हद्दीत 47 जण बाधित
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
अनलॉकचा चौथा टप्पा, सण-उत्सव, सीमाबंदी उठविल्यामुळे व बाहेरुन येणार्यांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असून, सोमवारी एका दिवसात 513 नवे रुग्ण आढळले. शहर व जिल्ह्यात मिळून 18 जणांचा मृत्यू झाला. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
ग्रामीण व नगरपालिका हद्दीत सोमवारी आढळलेल्या 513 रुग्णांमध्ये 317 पुरुष, तर 196 महिलांचा समावेश आहे. आज 16, तर आतापर्यंत 411 जणांचा मृत्यू झालयाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. 3 हजार 17 जणांपैकी 2 हजार 504 जण निगेटिव्ह, तर 513 जण पॉझिटिव्ह आढळले. 14 हजार 185 पैकी 8 हजार 643 पुरुष, 5 हजार 542 महिला आहेत. सोलापूर शहारात दोघांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 19 जणांना घरी पाठविण्यात आल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 318 पैकी 47 जण पॉझिटिव्ह, तर 271 जण निगेटिव्ह आले. 47 रुग्णांमध्ये 22 पुरुष, तर 25 महिलांचा समावेश आहे.
ग्रामीणमधील संख्या
होम क्वारंटाईन 6,514
आजपर्यंत तपासणा 1,11,668
प्राप्त अहवाल 1,11,531
प्रलंबित अहवाल 137
एकूण निगेटिव्ह 97,346
बाधितांची संख्या 14,185
रुग्णालयात दाखल 4,275
आतापर्यंत बरे 9,499
मृत 411
शहरातील संख्या
एकूण तपासणी 68,961
पॉझिटिव्ह रुग्ण 7,079
तपासणी अहवाल 68,905
प्रलंबित अहवाल 56
निगेटिव्ह अहवाल 61,826
एकूण मृत 429
रुग्णालयात दाखल 761
बरे झालेले 5,889
तालुकानिहाय संख्या
अक्कलकोट 737
मंगळवेढा 574
बार्शी 2,696
माढा 1,275
माळशिरस 1,793
मोहोळ 691
उत्तर सोलापूर 559
करमाळा 873
सांगोला 758
पंढरपूर 3,146
दक्षिण सोलापूर 1,083
एकूण 14,185









